आगामी विधानसभा निवडणूक लढवण्याबाबत सतेज पाटील यांची मोठी घोषणा!

आगामी विधानसभा निवडणूक लढवण्याबाबत सतेज पाटील यांची मोठी घोषणा!

कोल्हापूर – आगामी विधानसभा निवडणूक लढवण्याबाबत काँग्रेसचे विधानपरिषदेचे आमदार सतेज पाटील यांनी मोठी घोषणा केली आहे. सतेज पाटील यांनी आगामी विधानसभा निवडणूक लढविणार नसल्याचं म्हटलं आहे. सतेज पाटील यांचे पुतणे ऋतुराज पाटील हे कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातुन निवडणूक लढविणार आहेत. सतेज कार्यकर्ता मेळाव्यात काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी ही घोषणा केली आहे. विधानपरिषद आमदारांना काँग्रेस पक्ष विधानसभा निवडणुकीसाठी तिकीट देणार नसल्याचं स्पष्ट होताच, सतेज पाटील यांनी मेळावा घेवून विधानसभा निवडणुक न लढविण्याचा निर्णय घेतला असल्याचं दिसत आहे.

दरम्यान काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांच्या सतेज कार्यकर्ता मेळाव्यात शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक यांनी काँग्रेस उमेदवाराला पाठिंबा दर्शवला आहे. आमचं बी ठरलंय अस म्हणत मंडलिक कार्यकर्त्यांनी सतेज पाटील यांना विधानसभा निवडणुकीसाठी पाठिंबा दिला आहे. कोल्हापुरातील ड्रीम वर्ल्डमध्ये सतेज कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला. यावेळी त्यांनी पाठिंबा दर्शवला आहे.

COMMENTS