डी. वाय. पाटील यांचा राष्ट्रवादी प्रवेश हा आमच्यासाठी अनपेक्षित – सतेज पाटील

डी. वाय. पाटील यांचा राष्ट्रवादी प्रवेश हा आमच्यासाठी अनपेक्षित – सतेज पाटील

कोल्हापूर – पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचा राष्ट्रवादी प्रवेश हा आमच्यासाठी अनपेक्षित असा आहे. राजकारणापलीकडे जाऊन त्यांनी अनेक लोकांशी सलोख्याचे संबंध ठेवले आहेत. वयाच्या ८४ व्या वर्षी त्यांच्या वयाचा व तब्येतीचा विचार करता त्यांनी सक्रीय राजकारणात सहभागी व्हावे, हे अपेक्षीत नाही. कुटूंब म्हणून आमच्या सर्वांसाठी हा निर्णय आश्चर्यकारक असल्याचं वक्तव्य त्यांचे चिरंजीव आआणिकाँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी म्हटले आहे.

दरम्यान दादांच्या या निर्णयाची आम्हाला कल्पना नव्हती. एवढी वर्षे राजकीय, सामाजिक जीवनात कार्यरत असल्याने दादा अजूनही बरेचसे निर्णय स्वत:च्या पातळीवर घेतात. पण हा निर्णय होत असताना राष्ट्रवादीने आमच्या कुटूंबातील लोकांच्या कानावर हा विषय घालणे अपेक्षित होते. पण तसे झाले नाही याचे वाईट वाटते असही सतेज पाटील यांनी म्हटलं आहे.

या पार्श्वभूमीवर माझी राजकीय भूमिका मात्र स्पष्ट आहे आणि ती वेळोवेळी कार्यकर्त्यांसमोर जाहीरपणे मांडली आहे. काँग्रेस पक्ष वाढीसाठी मी आजपर्यंत जोमाने काम केले आहे. भविष्यातही मी तितक्याच जोमाने कार्यरत राहणार असल्याचंही यावेळी सतेज पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.

COMMENTS