ब्रेकिंग न्यूज – युवक काँग्रेसच्या प्रेदश अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाचा निकाल जाहीर !

ब्रेकिंग न्यूज – युवक काँग्रेसच्या प्रेदश अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाचा निकाल जाहीर !

मुंबई – युवक काँग्रेसच्या प्रेदश अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची निकाल आज जाहीर करण्यात आला आहे. युवक काँग्रेसच्या प्रदेश अध्यक्षपदी सत्यजित तांबे विजयी झाले आहेत. तर अमित झनक हे युवक काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी निवडून आले आहेत. तसेच भूषण मरस्कोले हे प्रदेश महासचिवपदी निवडून आले आहेत.

दरम्यान संगमनेरमध्ये सत्यजीत तांबे यांची प्रदेश अध्यक्ष नियुक्ती झाल्याबद्दल फटाके फोडून कार्यकर्त्यांनी आनंद साजरा केला आहे. नागपूर येथे आज युवक काँग्रेसच्या निवडीचा निकाल होता. तांबे  यांना 70 हजार 189 मते मिळाल्याने महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या निवडणुकीत सत्यजित विजयी झाले. आमदार झनक 32 हजार 999 मते मिळवून उपाध्यक्ष झाले. सत्यजीत तांबे हे 37 हजार 190 मताधिक्याने निवडून आले.

दरम्यान नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी दोन वेळा अहमदनगर जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून काम केले आहे. अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघातून त्यांनी 2014 ला काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढविली होती. गेल्या पंधरा वर्षांपासून एनएसयुआय व युवक काँग्रेसच्या माध्यमातून महाराष्ट्रात मोठी संघटनबांधणी त्यांनी केली आहे.

COMMENTS