सावित्रीबाई फुलेंचं पंतप्रधान मोदींना आव्हान !

सावित्रीबाई फुलेंचं पंतप्रधान मोदींना आव्हान !

लखनऊ – उत्तर प्रदेशमधील भाजपच्या खासदार सावित्रीबाई फुले यांनी मोदी सरकारला आव्हान दिलं आहे. १ एप्रिलपासून आंदोलन सुरू करणार असल्याची घोषणा सावित्रीबाई फुले यांनी लखनऊमध्ये केली आहे. केंद्रातील मोदी सरकार हे आरक्षणविरोधी असून सतत संविधान आणि आरक्षणाची समीक्षा करण्याचं काम केंद्र सरकार जाणीवपूर्वक करीत असून केंद्र सरकारचे धोरण हे अनुसुचित जाती आणि जमाती (SC/ST) च्या विरोध असल्याचा आरोप सावित्रीबाई फुले यांनी केला आहे.

दरम्यान केंद्र सरकारच्या या धोरणाविरोधात आवाज उठवण्यासाठी येत्या १ एप्रिलला लखनऊमध्ये ‘भारतीय संविधान बचाव रॅली’ काढण्यात येणार असल्याचं सावित्रीबाई फुले यांनी म्हटलं आहे. तसेच भारतीय संविधानामुळेच मी आज बहराइचमधील खासदार आहे. भारतीय संविधान नसते तर मला ही संधी मिळाली नसती. तसेच आरक्षण संपवण्यासाठी मोठा कट रचला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. तसेच जर आरक्षण काढून टाकले तर बहुजन समाजातील लोकांना संधी मिळणार नसल्याचंही सावित्रीबाई यांनी म्हटलं आहे. दरम्यान भाजपमधील खादारानंच आता सरकारविरोधात बंड पुकारले असल्यामुळे मोदी सरकारच्या अडचणती मोठी वाढ होत असल्याचं दिसत आहे.

 

 

COMMENTS