शेतकरी कर्जमुक्ती योजनेची दुसरी यादी जाहीर, नगरसह वर्ध्यातील शेतकऱ्यांचा समावेश !

शेतकरी कर्जमुक्ती योजनेची दुसरी यादी जाहीर, नगरसह वर्ध्यातील शेतकऱ्यांचा समावेश !

मुंबई – महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची दुसरी यादी आज जाहीर करण्यात आली.
या यादीत नगर जिल्ह्यातील २ लाख ५२ हजार शेतकऱ्यांचा समावेश असून ग्रामपंचायत निवडणूक जाहीर झालेल्या बाबुडी घुमट व विळद या दोन गावांतील शेतकऱ्यांना तूर्त कर्जमाफी योजनेचा लाभ मिळू शकलेला नाही.
तसेच ग्रामपंचायत निवडणूक आचारसंहिता लागू असल्याने सहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा या यादीत समावेश नाही.

दरम्यान वर्धा जिल्ह्यातील ४६ हजार ४२४ शेतकऱ्यांचा दुसऱ्या यादीत समावेश आहे. वर्ध्यातील पहिल्या यादीत दोन गावांतील १६६ शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली होती. त्यातील १५४ शेतकऱ्यांच्या खात्यात आतापर्यंत पैसे जमा झाले आहेत. दुसऱ्या यादीत कोल्हापूर जिल्ह्यातील ४२ हजार ९१३ शेतकऱ्यांचा समावेश असून पुढील प्रक्रिया तातडीने सुरू करण्यात आली आहे.

महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना, 2019 ची माहिती

1) एकूण अपेक्षित कर्जखती ३६.४५ लाख

2) पोर्टलवर अपलोड झालेल्या खात्यांची संख्या = ३४.९८ लाख खाती

3) यादी प्रसिध्द केलेल्या खात्यांची GB संख्या = २१.८२ लाख खाती, त्यासाठी लागणारी रक्कम रु १४,००० कोटी

4) शासनाने यासाठी तरतूद केली आहे.

5) संपूर्ण यादी प्रसिध्द केलेल्या जिल्ह्याची संख्या = १५

6) ग्रामपचायत निवडणूक आचरसंहिता लागू असल्याने अंशतः यादी प्रसिध्द केलेल्या जिल्ह्याची संख्या = १३

७) ग्रामपंचायत निवडणूक आचरसंहिता लागू असल्याने यादी प्रसिद्ध न केलेल्या जिल्ह्याची संख्या = ६

८) आत्तापर्यंत प्रमाणीकरण झालेले कर्जखाती=७२,९४७

९) प्रमाणीकरण नंतर व्यापारी बँका २४ तासांमध्ये व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका ७२ तासांमध्ये संबंधित लाभार्थ्यांना त्यांच्या कर्ज खात्यावर लाभ देणार आहेत.

COMMENTS