नाणार प्रकल्पाचे मंत्रिमंडळ बैठकीत पडसाद, शिवसेनेचे मंत्री आक्रमक !

नाणार प्रकल्पाचे मंत्रिमंडळ बैठकीत पडसाद, शिवसेनेचे मंत्री आक्रमक !

मुंबई – कोकणातील नाणार प्रकल्पाचे पडसाद मंत्रिमंडळ बैठकीत उमटले. शिवसेनेच्या मंत्र्यांनी आक्रमक पावित्रा घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तीव्र नाराजी व्यक्त करीत निषेध नोंदविला असल्याची माहिती आहे. शिवसेनेचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी या बैठकीकडे आज पाठ फिरवली होती. यावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री उद्या बैठक घेणार असल्याची माहिती आहे. तसेच प्रकल्प रेटायचा प्रयत्न केल्यास मंत्रिपदाचा राजीनामा देईन, असा इशारा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिला आहे. त्यामुळे उद्याच्या बैठकीकडे लक्ष लागलं आहे.

दरम्यान नाणारमधील प्रकल्पाला स्थानिकांसह शिवसेनेनं तीव्र विरोध केला आहे. परंतु हा विरोध झुगारत सोमवारी सौदी अरामको आणि एडनॉक कंपन्यांमध्ये 3 लाख कोटींच्या सामंजस्य करारावर नवी दिल्लीत केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या उपस्थितीत स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. त्यानंतर शिवसेनेनं आक्रमक भूमिका घेतली असून याचे पडसाद आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत पहावयास मिळाले आहेत.

दिवाकर रावते

अबू धाबी आणि केंद्र सरकारमध्ये गुंतवणूक करार झाला आहे. या कराराला थांबवण्या ऐवजी गती देण्याचे काम केंद्राकडून जोरात सुरू आहे. हा करार करतांना मुख्यमंत्री आणि उद्योग मंत्री यांना अंधारात ठेवले.

COMMENTS