महादेव जानकर यांना न्यायालयाकडून दिलासा !

महादेव जानकर यांना न्यायालयाकडून दिलासा !

गडचिरोली – पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यविकास मंत्री आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांना मंगळवारी देसाईगंज न्यायालयाने दिलासा दिला आहे. सबळपुराव्या अभावी जानकर यांना न्यायालयाने दोषमुक्त केले आहे. देसाईगंज नगर परिषद निवडणुकीत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यावर दबाव टाकल्याचा त्यांचावर आरोप होता.या प्रकरणी काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार मंत्री महादेव जानकर व उमेदवार जेसा मोटवानी यांच्या विरुध्द लोकसेवकाला कायदेशीर कृत्य करताना दबाव आणल्याप्रकरणी देसाईगंज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दरम्यान डिसेंबर २०१६ रोजी देसाईगंज नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक होती. या निवडणुकीपूर्वी ५ डिसेंबर २०१६ रोजी मंत्री महादेव जानकर देसाईगंज येथे गेले होते. त्यावेळी  त्यांनी प्रभाग क्रमांक ९ ब मधील काँग्रेसचे उमेदवार जेसा मोटवानी यांच्या पक्षातर्फे सादर केलेले नामनिर्देशनपत्र मागे घेऊ द्यावे व त्यांना कपबशी हे निवडणूक चिन्ह द्यावे, यासाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांवर दबाव आणल्याचा आरोप होता. याबाबतची चित्रफीतही व्हायरल झाली होती. परंतु सबळ पुराव्या अभावी त्यांची याप्रकरणातून अखेर सुटका करण्यात आली आहे.

 

COMMENTS