शाहनवाज हुसैन यांच्यावर उद्योग मंत्रीपदाची जबाबदारी

शाहनवाज हुसैन यांच्यावर उद्योग मंत्रीपदाची जबाबदारी

पाटणा : बिहारमध्ये नितीश कुमार यांच्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार मंगळवारी पार पडला. याद्वारे मंत्रिमंडळात भाजपला नऊ तर जनता दल युनायटेडला आठ जागा मिळाल्या आहेत. नितीन कुमार यांचे मित्र राहिलेले सुशील मोदी यांना दिल्लीत बोलवण्यात आले. त्यामुळे त्यांच्या जागी दिल्लीतून माजी केंद्रीय मंत्री व भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शाहनवाज हुसैन यांना बिहारमध्ये पाठविण्यात आले. त्यांच्याकडे बिहारच्या उद्योग मंत्रीपदाची जबाबदारी सोवण्यात आली आहे.

शाहनवाज हुसैन हे दि. १९९९ मध्ये पहिल्यांदा लोकसभेत निवडून आले. त्यांनी तीन वेळा प्रतिनिधीत्व केले. पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या मंत्रीमंडळात सर्वात तरुण मंत्री म्हणून त्यांनी काम केले. २०१४ च्या लोकसभेत त्यांचा पराभव झाल्यापासून त्यांच्याकडे पक्षाच्या नेतृत्वाने संधी दिली नाही.

नरेंद्र मोदी व अमित शहा यांच्या भाजपमध्ये त्यांना राष्ट्रीय प्रवक्ते पदाची संधी देण्यात आली होती. मात्र, इतर संघटनात्मक पद किंवा राज्यसभेवर त्यांची अपेक्षा होती. पण त्यांना दिली जात नसल्याने ते अडगळीस पडले होते. परंतु त्यांनी पक्षीय नेतृत्वावर टिका करण्याचे धाडस केले नाही. संयम ठेवला. दरम्यान, जानेवारी महिन्यात त्यांना पक्षाच्या नेतृत्वाने बिहार विधीमंडळात जाण्याचा आदेश आला. त्यांनी नाईलाजस्तव विधानपरिषदेचे सदस्य स्विकारले. आज पाटणा स्थित राजभवनात आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात राज्यपाल फागू चौहान यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या उपस्थितीत एकूण १७ नव्या मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. भाजप आमदार शाहनवाज हुसैन यांना मंत्रीपद देण्यात आले आहे.

COMMENTS