शनी शिंगणापूर मंदिर राज्य सरकारच्या ताब्यात !

शनी शिंगणापूर मंदिर राज्य सरकारच्या ताब्यात !

नागपूर – अहमदनगरमधील शनी शिंगणापूर हे मंदिर आता राज्य सरकारच्या ताब्यात गेलं आहे. याबाबतचं विधेयक मंजूर करण्यात आलं आहे. त्यामुळे सध्याच्या सार्वजनिक न्यासाची पुनरर्चना करुन नवीन अधिनियमाद्वारे शनैश्वर देवस्थान राज्य सरकारच्या नियंत्रणाखाली येणार आहे. हे मंदिर राज्य सरकारच्या ताब्यात गेल्यामुळे भाविकांना अधिकाधीक सोयी-सुविधा पुरवल्या जाणार आहेत. तसेच शनी मंदिराच्या चौथ-यावर आता महिलांनाही जाऊ दिलं जाणार आहे.

दरम्यान या मंदिराच्या विश्वस्त मंडळाने अनेकवेळा मोठ्याप्रमाणात गैरव्यवहार केला असल्याचं उघड झालं आहे. तसेच सध्याच्या विश्वस्त मंडळाच्या नियुक्तीवरुनही वाद निर्माण झाला आहे. त्यामुळे राज्य सरकारनं हे विधेयक मंजूर केलं असून  देवस्थानचे व्यवस्थान अधिक व्यापक, पारदर्शक आणि कार्यक्षम करण्याबरोबर भाविकांना उत्तर सोयीसुविधा पुरवण्यासाठी हा स्वतंत्र कायदा असणार आहे. त्यामुळे देशभरातून याठिकाणी येणा-या भाविकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

COMMENTS