पंढरपूर – शंकर सहकारी साखर कारखाना निवडणूक, रणजितसिंह मोहिते पाटलांच्या पॅनलचा दणदणीत विजय !

पंढरपूर – शंकर सहकारी साखर कारखाना निवडणूक, रणजितसिंह मोहिते पाटलांच्या पॅनलचा दणदणीत विजय !

सोलापूर, पंढरपूर – माळशिरस तालुक्यातील सदाशिवनगरच्या शंकर सहकारी साखर कारखान्याची निवडणुकीत माजी खासदार रणजिंतसिंह मोहिते पाटील यांच्या पॅनलने दणदणीत विजय मिळवला आहे. रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या पॅनलचे सर्वच उमेदवार तब्बल साडेतीन हजार मतांनी विजयी झाले आहेत.

धवलसिंह मोहिते पाटील यांच्या पॅनलाचा दारुण पराभव झाला आहे. सुमारे ४० वर्षानंतर या कारखान्याची निवडणुक झाली  आहे. माळशिरस गटातील मिलिंद कुलकर्णी, धोंडीराम नाळे आणि सुरेश पाटील यांनीही दणदणीत विजय मिळवला आहे.

दरम्यान माळशिरस तालुक्यातील सदाशिवनगरच्या शंकर सहकारी साखर कारखान्याची निवडणूक 40 वर्षानंतर पहिल्यांदाच पार पडली आहे. सहकार महर्षी शंकरराव मोहीते पाटील यांनी हा कारखाना चालवलेला आहे. त्यांच्या पश्चात मोहीते पाटील कुटूंबातील नातवंडे एकमेकांविरोधात लढले आहेत.

माजी मंत्री दिवंगत प्रतापसिंह मोहीते पाटील यांचे पुत्र धवलसिंह यांचे पॅनल विरूध्द खासदार विजयसिंह मोहीते पाटील यांचे पुत्र रणजिसिंह यांच्या पॅनलनं ही निवडणूक लढवली आहे. यामध्ये खासदार विजयसिंह मोहीते पाटील यांच्या पॅनलनं बाजी मारली आहे.

COMMENTS