शरद पवारांना वाढदिवसांच्या मान्यवरांकडून शुभेच्छा

शरद पवारांना वाढदिवसांच्या मान्यवरांकडून शुभेच्छा

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज आपला 80 वाढदिवस साजरा करत आहेत. देशभरातील नेते त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही शरद पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिला आहे. राष्ट्रवादीच्या वतीने दुपारी वाय.बी. चव्हाण सभागृहात ८ दशकं कृतज्ञतेची कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमानंतर सायंकाळी शरद पवार यांनी कुटुंबीयांसोबत वाढदिवस साजरा केला. वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचा व्हिडीओ खासदार सु्प्रिया सुळे यांनी सोशल केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून शरद पवार यांना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा दिल्या आहे. शरद पवार यांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा, तुम्हाला चांगले निरोगी आरोग्य लाभो, दीर्घआयुषी व्हावा, असे म्हणत पंतप्रधाना मोदींनी शरद पवारांना शुभेच्छा दिल्या आहेत.

तसेच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी ‘महाविकास आघाडीचे आधारस्तंभ, आदरणीय श्री. शरद पवार साहेब यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! त्यांची ऊर्जा, उत्साह आम्हा सर्वांना नेहमी प्रेरणा देत राहो हीच सदिच्छा. त्यांना उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो ही शुभकामना.’ असे म्हणत शुभेच्छा दिल्या आहेत.

काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष, माजी केंद्रीय कृषी मंत्री आदरणीय शरदचंद्रजी पवार यांना वाढदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा! आपणास उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो याच सदिच्छा. ‘ या शब्दात शुभेच्छा दिल्या. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.

COMMENTS