विधानसभा निवडणुकीसाठी शरद पवारांनी बोलावली महत्त्वाची बैठक !

विधानसभा निवडणुकीसाठी शरद पवारांनी बोलावली महत्त्वाची बैठक !

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठक बोलावली आहे. पवारांनी पक्षातील सर्व नेत्यांची बैठक बोलावली आहे.1 जून रोजी ही बैठक पार पडणार असून यशवंतराव चव्हाण भवनात सकाळी बैठकीचं आयोजन केलं आहे. ही बैठक सकाळच्या सत्रात पक्षातल्या ज्येष्ठ नेत्यांसोबत तर दुपारच्या सत्रात आमदार-खासदारांसोबत पार पडणार आहे त्यामुळे या बैठकीकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.

राज्यात लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला अपेक्षित यश मिळालं नाही. पक्षाला अवघ्या 4 जागा मिळाल्या आहेत. तर अमरावतीत राष्ट्रवादी पुरस्कृत उमेदवार नवनीत कौर राणा यांनी विजय मिळवला. त्यामुळे आगामी निवडणुकीत झालेल्या चुका कशा टाळता येतील, यावर या बैठकीत चर्चा केली जाणार आहे.

लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला अपेक्षित यश मिळालं नाही. त्यामुळे निकालानंतर शरद पवारांनी इन्स्टाग्रामवर ‘जिंकलो नसलो तरी हरलो नाही’ या आशयाची पोस्ट टाकून कार्यकर्त्यांना न खचण्याचं आवाहन केलं होतं. त्यानंतर आता 1 जुनला नेत्यांची बैठक बोलावली आहे.

COMMENTS