शरद पवारांनी बोलावली महत्त्वाची बैठक, मोठा निर्णय घेणार?

शरद पवारांनी बोलावली महत्त्वाची बैठक, मोठा निर्णय घेणार?

मुंबई – भाजप-शिवसेनेमध्ये अजूनही सत्तास्थापन करण्यावरुन मतभेद सुरु आहेत. शिवसेना आपल्या फर्म्युल्यावर ठाम आहे. त्यामुळे दोन्ही पक्षातील मतभेद कधी दूर होणार याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. भाजप-शिवसेनेमध्ये सुरु असलेल्या या संघर्षामुळे विरोधकांनी आता हालचाल सुरु केली आहे. काल राज्यातील काँग्रेस नेत्यांनी दिल्लीत जाऊन ज्येष्ठांची भेट घेतल्यानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या प्रमुख नेत्यांची तातडीची बैठक बोलावली आहे. या बैठकीला राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते धनंजय मुंडे, छन भुजबळ हे उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत राज्यातील राजकीय घडामोडींवर चर्चा होणार असल्याची माहिती आहे.

दरम्यान शरद पवार हे उद्या संध्याकाळी दिल्लीत जाऊन काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत.यापूर्वी शिवसेनेने सत्तास्थापनेसाठी पुढाकार घ्यावा, त्यांना आम्ही पाठिंबा देऊ, अशी भूमिका राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांनी घेतली आहे. काल काँग्रेसच्या नेत्यांनी दिल्लीत जाऊन ज्येष्ठ नेत्यांशी चर्चा केली. त्यानंतर आता शरद पवार सोनिया गांधी यांनै दिल्लीला जाऊन भेटणार आहेत. त्यामुळे आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

COMMENTS