राजकीय हालचालींना वेग, शरद पवारांनी बोलावली राष्ट्रवादीच्या सर्व आमदार, खासदारांची बैठक !

राजकीय हालचालींना वेग, शरद पवारांनी बोलावली राष्ट्रवादीच्या सर्व आमदार, खासदारांची बैठक !

मुंबई – राज्यात राजकीय हालचालींना वेग आला असून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या सर्व आमदार, खासदारांची बैठक बोलावली आहे. 12 तारखेला सत्तास्थापनेच्या तिढ्यावर चर्चा करण्यासाठी ही बैठक बोलावली आहे. शिवसेनेला पाठिंबा देण्यासंदर्भात या बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती आहे. काल काँग्रेस नेत्यांशी शरद पवार यांनी चर्चा केली होती. त्यानंतर आम्ही राज्यपालांच्या भूमिकेवर लक्ष ठेवून आहोत, असं आघाडीच्या नेत्यांनी म्हटलं होतं. त्यानंतर आता पवारांनी बैठक बोलावल्यामुळे या बैठकीत काय निर्णय घेतला जाणार याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.

दरम्यान विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून 16 दिवस झाले आहेत. परंतु भाजप शिवसेनेमध्ये मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच सुरु झाल्यामुळे राज्यात अद्याप सरकार स्थापन होऊ शकलं नाही. काल फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर शिवसेना काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाऊन सत्ता स्थापनेचा दावा करणार असल्याचं बोललं जात आहे. त्यानंतर आता शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या सर्व आमदार, खासदारांची बैठक बोलावली आहे. 12 तारखेला सत्तास्थापनेच्या तिढ्यावर चर्चा करण्यासाठी ही बैठक बोलावली आहे. शिवसेनेला पाठिंबा देण्यासंदर्भात या बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती आहे.

परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज मोठं वक्तव्य केलं आहे. प्रभावी विरोधी पक्ष हीच आमची जबाबदारी असल्याचा आज पवार यांनी पुनरुच्चार केला आहे. शिवसेनेबरोबर जाण्याचा कुठलाही विचार अजून झालेला नाही, असंही पवार यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे पवार या बैठकीत काय भूमिका घेणार हे पाहण गरजेचं आहे.

COMMENTS