मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीतील शरद पवारांच्या प्रमुख मागण्या।

मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीतील शरद पवारांच्या प्रमुख मागण्या।

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद यांनी राज्यातील दुष्काळासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत वर्षा या निवासस्थानी बैोठक घेतली. या बैठकीत शरद पवार यांनी आपल्या दुष्काळ दौऱ्यानंतर लोकांकडून आलेल्या मगाण्या मुख्यमंत्र्यांसमोर मांडल्या.
या बैठकीत फळबाग, चारा छावण्या, दुष्काळी भागातील नागरिकांच्या हाताला काम, योग्य पाणी नियोजन, दुष्काळ भागात अन्नधान्य नियोजन, जायकवाडी धरण पाणी या प्रमुख विषयांवर चर्चा करण्यात आली. मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या या बैठकीला शरद पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे विधीमंडळ पक्षनेते अजित पवार, प्रफुल्ल पटेल, राणा जगजीतसिंह पाटील, दीपक साळुंखे उपस्थित होते.

दरम्यान शरद पवार यांनी दुष्काळग्रस्त भागात जनावरांसाठी चारा छावण्या उशिरा दिल्या गेल्या. चारा अनुदान केवळ 90 रुपये दिले जाते ते 110 करण्याची मागणी केली आहे. तसेच छावण्या सुरू झाल्या पण ज्या संस्था छावण्या चालवतात त्यांना पैसे दिले गेले नाहीत. एका दिवसाचा संस्थांचा खर्च 1 लाख आहे महिनाभर छावण्या कशा चालवणार? असं पवार यांनी म्हटलं आहे.

तसेच विम्याचे पैसे मिळाले नाहीत. फळबाग योजना विमा का मिळाली नाही?, जायकवाडी धरणाचे पाणी मराठवाड्याला सध्या देण्यात यावे. नाहीतर बाष्पीभवन होऊन ते पाणी वाया जाईल. केवळ ऊस चारा म्हणून न देता इतर चारा द्यावा अशी मागणीही पवारांनी केली आहे.

फळबागा जळून चालल्या आहेत. फळबाग जळणे म्हणजे 25 वर्षांचं नुकसान आहे. आमच्या सरकारच्या काळात आम्ही प्रति-हेक्टर 35 हजार दिले होते ते द्यावेत,

2011 च्या जनगणनेनुसार पाणी दिले जाते त्यात बदल करावा. दुष्काळग्रस्त भागात पाणी वाटपात घोटाळा होतो ते रोखावे या मागण्या पवार यांनी मुख्यमंत्र्यांकडे केल्या आहेत.

COMMENTS