“माझ्या नातवाच्या बोलण्याला आम्ही कवडीचीही किंमत देत नाही”, शरद पवारांनी पार्थ पवार यांना फटकारले !

“माझ्या नातवाच्या बोलण्याला आम्ही कवडीचीही किंमत देत नाही”, शरद पवारांनी पार्थ पवार यांना फटकारले !

मुंबई – माझ्या नातवाच्या बोलण्याला आम्ही कवडीचीही किंमत देत नाही असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपला नातू पार्थ पवार यांना जाहिररित्या फटकारले आहे.
तो अप्रगल्भ आहे. मात्र, कुणाला सीबीआय चौकशी करायची असेल तर मी विरोध करणार नाही. मात्र, माझा महाराष्ट्र पोलीस, मुंबई पोलिसांवर पूर्ण विश्वास आहे. मी कुणाला सीबीआय चौकशीची गरज वाटत असेल तर त्यालाही काही विरोध असण्याचं कारण नसल्याचं पवारांनी म्हटलं आहे.

दरम्यान पार्थ पवार यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेऊन सुशांत सिंह प्रकरणाची चौकशी सीबीआयमार्फत करण्याची मागणी केली होती. सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाची योग्य चौकशी व्हावी, ही संपूर्ण देश, विशेषत: तरुणांची भावना आहे. मी गृहमंत्री अनिल देशमुख  यांना विनंती केली, की राष्ट्रीय भावना विचारात घेऊन सीबीआय चौकशी सुरु करावी असं ट्वीट पार्थ पवार यांनी केलं होतं. त्यावर माझ्या नातवाच्या बोलण्याला आम्ही कवडीचीही किंमत देत नाही असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपला नातू पार्थ पवार यांना जाहिररित्या फटकारले आहे.

COMMENTS