शरद पवारांचा उद्यापासून निवडणूक प्रचाराचा झंझावाती दौरा, उत्तर महाराष्ट्र, विदर्भात विरोधकांवर धडाडणार तोफ!

शरद पवारांचा उद्यापासून निवडणूक प्रचाराचा झंझावाती दौरा, उत्तर महाराष्ट्र, विदर्भात विरोधकांवर धडाडणार तोफ!

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचा तीन दिवसाचा निवडणूक प्रचार दौरा उद्यापासून सुरू होत आहे. पहिल्या टप्प्यात उस्मानाबाद, ठाणे, कोल्हापूर असा निवडणूक प्रचाराचा झंझावाती दौरा केल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात दिनांक ८ ते १० ऑक्टोबरपर्यंत शरद पवार झंझावाती दौरा करणार आहेत.

अहमदनगर जिल्ह्यातील पारनेरमध्ये दिनांक ८ ऑक्टोबर रोजी सकाळी ११. ३० वाजता, पारोळा सायंकाळी ५ वाजता, दिनांक ९ ऑक्टोबर रोजी विदर्भात अकोला जिल्ह्यातील बाळापुर येथे सकाळी ११. ३० वाजता, वाशिम जिल्ह्यातील मानोरा – कारंजा दुपारी ४ वाजता, दिनांक १० ऑक्टोबर रोजी हिंगणघाट सकाळी १०. ३० वाजता, बुटीबोरी- हिंगणा ३ वाजता, काटोल ५ वाजता आदी ठिकाणी जाहीर सभा होणार आहेत.

COMMENTS