“असा” आहे शरद पवारांचा जागावाटपाचा फॉर्म्युला, राहुल गांधींना पाठवला फॉर्म्युला ?

“असा” आहे शरद पवारांचा जागावाटपाचा फॉर्म्युला, राहुल गांधींना पाठवला फॉर्म्युला ?

नवी दिल्ली –  भाजपच्या हातातून सत्ता हिसकाऊन घेण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचं बिगूल वाजलं असल्याचं दिसत आहे. आगामी निवडणुकांमधील युतीबाबतचा पहिला प्रस्ताव राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांना पाठवला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या प्रस्तावात महाराष्ट्रातील निवडणुकांमध्ये 131 -131 जागांचा फॉर्म्युला शरद पवार यांनी पाठवला आहे. विधानसभेच्या 288 जागांसाठी ही निवडणूक होणार असून यामधील 131 जागा काँग्रेस आणि 131 जागा राष्ट्रवादी काँग्रेस लढवणार असून उरलेल्या 26 जागा या इतर मित्रपक्षांना देण्याचा प्रस्ताव पवार यांनी राहुल गांधींकडे पाठवला असल्याची माहिती आहे.

दरम्यान काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी हे मंगळवारी मुंबई दौ-यावर येणार आहेत. यादरम्यान आघाडीबाबत ते चर्चा करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच या आघाडीमध्ये बहुजन समाज पार्टी, शेतकरी कामगार पार्टी, समाजवादी पार्टी, आरपीआई गवई कवाडे गुट आणि बहुजन विकास आघाडी पार्टी हे समाविष्ट् होणार आहेत. त्यामुळे या पक्षांना 26 पैकी प्रत्येकी किती जागा दिल्या जाणार आहेत याकडे लक्ष लागलं आहे.

दरम्यान लोकसभा निवडणुकीमध्येही काँग्रेसनं आपआपले मतदारसंघ राखून ठेवले असल्याचं दिसत असून 48 जागांपैकी काँग्रेस 24 जागांवर तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी 18 जागांवर इच्छूक असून उरलेल्या आठ जागा या मित्रपक्षांना देण्यात येणार आहेत. यामध्ये बहुजन विकास आघाडीला पालघर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेला इचलकरंजी, समाजवादी पार्टीला भिवंडी, आरपीआई गवई कवाडे गुटाला विदर्भातील एक जागा दिली जाणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 

COMMENTS