‘त्या’ भानगडीत आपण पडायचं नाही, असं मी ठरवलंय – शरद पवार

‘त्या’ भानगडीत आपण पडायचं नाही, असं मी ठरवलंय – शरद पवार

बारामती, निरा – बारामती मतदारसंघाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची सभा निरा गावात पार पडली.
मी सध्या निवडणूक लढवत नाही. मी वरच्या म्हणजे राज्यसभेत आहे. खालच्या सभागृहाच्या म्हणजे लोकसभेच्या भानगडीत आपण पडायचं नाही असं मी ठरवलं असल्याचं यावेळी पवारांनी ठरवलं आहे.

यावेळी पवार यांनी भाजपाध्यक्ष अमित शाहांवर जोरदार टीका केली. अमित शाह यांचं बारामतीत स्वागत आहे. मोकळ्या हातांनी आम्ही पाठवणारच आहोत. आम्ही त्यांचा उत्तम पाहुनचार करु. शाह गुजराती आहेत, त्यांना व्यवहार चांगला कळतो, त्यामुळे ते काहीतरी मुद्दा उपस्थित करतील, पण आम्ही आमचा मुद्दा सोडणार नाहीत. शेतकऱ्यांचं कर्ज माफ न करता कारखानदारांचं कर्ज माफ करू असं शाह म्हणातात. त्याची निती काय आहे ते यावरून कळत असल्याचंही पवारांनी म्हटलं आहे.

दरम्यान आपल्या देशात शेतकऱ्याच्या हिताचा विचार केला जात नाही. शेती आणि शेतकऱ्यांचा प्रश्नाकडे सरकारचं दुर्लक्ष आहे. दिवसांपूर्वी पंतप्रधान मोदी अकलूजमध्ये आले. ते तिथे मुद्दाम आले. शरद पवार फक्त साखर धंद्यात जास्त लक्ष देतात अशी टिका पंतप्रधानांनी केली. गेल्या ५० वर्षांत मी कुठल्या कारखान्याचा साधा संचालकही नाही. तरीदेखील माझा श्वास चालेपर्यंत मी या शेतकऱ्यांसाठी झटणार आहे.

तसेच माझा पुतन्या सगळं बघायला लागलाय, माझ्या हातातील सत्ता गेली अशी टीका पंतप्रधान करतात. यात काय गैर आहे? मला त्यात आनंदच आहे. त्यांना मुल ना बाळ त्यांना काय कळणार, देशातील महत्वाच्या प्रश्नांवर बोलण्याऐवजी ते आमच्या कुटुंबावर टीक करत आहेत.

तसेच आम्हाला कळलं कोल्हापुरमधून कोणीतरी इथं येऊन बसलय. कुणाच्या तरी घरात जातो. काहीतरी देतो, मला फार काही माहिती नाही.( चंद्रकांत पाटलांवर नाव न घेता टीका ) बारामती काही करुन घेणार असं अमित शाह, देवेंद्र फडणवीस म्हणतात. त्यांना काय म्हणायचं ते म्हणू द्या. आम्ही एकच सांगतो. आम्ही कुणाच्या नादाला लागत नाही. पण कोणी आमच्या नादाला लागला तर त्याला सोडत नाही. देशात बारामतीची निवडणूक एक नंबरची निवडणूक आहे. मोदींची पण नाही. आपण किती भारी लोक आहोत ते बघा असंही पवारांनी म्हटलं आहे.

COMMENTS