बीड – शरद पवारांचा मोठेपणा, उन्हातल्या हजारो कार्यकर्त्यांना दिली सावली !

बीड – शरद पवारांचा मोठेपणा, उन्हातल्या हजारो कार्यकर्त्यांना दिली सावली !

बीड – बीडमध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या विजय संकल्प मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी शरद पवार यांचा मोठेपणा समोर आला आहे. त्यांच्या एका इशा-यामुळे उन्हातल्या हजारो कार्यकर्त्यांना सावली मिळाली आहे. शरद पवार यांनी फक्त एक हात केला आणि उन्हात उभ्या राहिलेल्या हजारो कार्यकर्त्यांना सावली मिळाली.

दरम्यान झालं असं की आजच्या सभेसाठी बागलाने मैदान तुडंब भरून गेले होते. मैदाना इतकीच गर्दी मैदानाबाहेर जमली होती. उन्हामध्ये हे कार्यकर्ते उभा राहुन सभा ऐकत होते. पवार साहेबांना झेड सुरक्षा असल्यामुळे  डी झोन करण्यात आला होता या झोन मध्ये पोलीसांशिवाय कोणीच नव्हते आणि बाहेर मात्र हजारो लोक उन्हात उभे होते.

शरद पवारांच्या नजरेत ही गोष्ट येताच त्यांनी बाजुला बसलेल्या धनंजय मुंडेंना उन्हात असलेल्या लोकांना डी झोनमध्ये बसु द्या अशी सुचना केली माझ्या सुरक्षेपेक्षा उन्हातील लोकांची मला जास्त काळजी वाटते असे ते म्हणाले. मुंडेंनी पोलीसांना त्याप्रमाणे सुचना दिली आणि एका क्षणात उन्हातील हजारो कार्यकर्ते डी झोनमधल्या सावलीमध्ये येऊन बसले. साहेबांना त्यांना अगदी जवळून पहावयास मिळत होते, याचा आनंद त्यांच्या चेहर्‍यावर वेगळाच जाणवत होता.

COMMENTS