आमचं सरकार आलं तर कोणत्याही अटी न ठेवता संपूर्ण कर्जमाफी देऊ – शरद पवार

आमचं सरकार आलं तर कोणत्याही अटी न ठेवता संपूर्ण कर्जमाफी देऊ – शरद पवार

बुलढाणा – शेतकऱ्यांच्या आत्महत्या होण्यास हे भाजप सरकार जबाबदार असल्याची जोरदार टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. पुलवामा येथे हल्ल्यात शहीद झालेल्या बुलढाणा जिल्ह्यातील दोन्ही जवानांच्या कुटुंबाला तुम्ही सांत्वन देऊ शकले नाही. पांढरकवड्यात सभा झाल्यावर तुम्हाला बुलढाणा जवळ असतानाही तुम्ही आले नाहीत. अशी टीकाही पंतप्रधान मोदींवर पवारांनी केली आहे. तसेच आम्ही कर्ज माफ करतांना कोणत्याही प्रकारच्या अटी ठेवल्या नव्हत्या. मोठ्या लोकांचं तुम्ही कर्ज माफ करता, मग शेतकऱ्यांचं का नाही? असा सवालही पवारांनी केला आहे. ते बुलढाण्यातील सभेत बोलत होते.

दरम्यान कांदा उत्पादन शेतकऱ्यांना कमी किंमतीमुळे फार नुकसान सोसावं लागलं पण भाजप सरकारला त्याचं काही घेणं देणं नाही. आमचं सरकार आलं तर कोणत्याही अटी न ठेवता आम्ही संपूर्ण कर्जमाफी देऊ
तुम्ही आमच्या उमेदवाराला निवडून आणा आम्ही सर्वकाही ठीक करतो असं आश्वासमही पवारांनी दिलं आहे.

तसेच यावेळी राफेल कारारावही पवारांनी टीका केली.
राफेलची किंमत अमच्यावेळेस कमी होती आणि भाजप सरकारने ते जास्त किंमतीत खरेदी केले. त्यामळे सरकारनं ते वाढीव किंमतीमध्ये खरेदी का केले? जवानांच्या त्यागाचं आणि शौर्याचं तुम्हाला महत्त्व नसल्याची टीकाही पवारांनी यावेळी केली आहे.

COMMENTS