तुमचा दत्तक बाप कुठे आहे?  -शरद पवार

तुमचा दत्तक बाप कुठे आहे? -शरद पवार

नाशिक – विधानसभा निवडणुकांच्या मतदानासाठी अवघे 2 दिवस बाकी आहेत. त्यामुळे राजकीय वातावरण चांगलच तापत आहे. राजकीय नेते आपल्या विरोधकांवर जोरदार टीका करत आहेत. सध्या नेत्यांच्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी गाजत आहेत. अशात शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांच्यावर टीका केली आहे. मुख्यमंत्र्यांनी नाशिक दत्तक घेतलं पण इथे कसलीच प्रगती झालेली नाही. नाशिककरांना विचारलं की तुमचा दत्तक बाप कुठे आहे? आता नाशिकला दत्तक बापाची गरज नाही. आमच्या बापात दम आहे असं म्हणत शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे.

दरम्यान मुख्यमंत्री म्हणतात समोर कोणी पैलवान दिसत नाही. पण 24 तारखेनंतर अंगाला तेल लावलेले पैलवान त्यांना दिसतील. मी कुस्तीगीर संघटनेचा अध्यक्ष आहे हे तुम्ही विसरू नका. तुम्हाला रेवड्यांवर खेळणारा पोरगाही सरळ करेल असा टोला शरद पवारांनी लगावला आहे.

COMMENTS