आम्ही म्हणतो तसंच वाकलं पाहिजे, असा सरकारचा कारभार – शरद पवार

आम्ही म्हणतो तसंच वाकलं पाहिजे, असा सरकारचा कारभार – शरद पवार

पुणे – राष्ट्रवादी महिला काँग्रेसतर्फे पुण्यात ‘संविधान बचाओ देश बचाओ’ या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शन केलं आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, राषट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, राष्ट्रवादीच्या नेत्या डॉ. फौजिया खान या कार्यक्रमाला उपस्थित . होते. पुण्यातील गणेश कला क्रीडा मंचात हा कार्यक्रम आजयोजित करण्यात आला होता.

यावेळी बोलत असताना शरद पवार यांनी भाजप सरकारवर जोरदार टीका केली आहे. लोकशाहीत राज्य लोकसांठी चालवलं गेलं पाहिजे, संविधानाची प्रतिष्ठा राखली गेली पाहिजे. सध्या सत्तेचा गैरवापर होताना दिसतो, संविधानाची पायमल्ली सुरु आहे. सीबीआयच्या प्रमुखांना रात्री 1 वाजता घरी पाठवलं जात आहे, आम्ही म्हणतो तसच वाकलं पाहिजे असा सरकारचा कारभार सुरु असल्याची टीका शरद पवार यांनी केली आहे.

दरम्यान शबरीमाला मंदीरात महिलांना प्रवेशाबाबत भाजपच्या अध्यक्षांचं विधान म्हणजे त्यांना न्यायव्यवस्था मान्य नसल्याचं उदाहरण असल्याचंही यावेळी पवारांनी म्हटलं आहे. तसेच ज्यांना न्यायालयाचा निर्णय मान्य नाही. स्त्री समानतेचं सूत्र मान्य नाही, त्यांचा घटनेवर, प्रशासनावर विश्वास नाही. अशा लोकांच्या हातात सत्ता आहे ही चिंतेची बाब असल्याचंही यावेळी पवार यांनी म्हटलं आहे.

तसेच राज्यात दुष्काळाचं संकट आहे, मात्र सरकारला त्याची काळजी नाही. राज्य असो वा केंद्रात ही परिस्थती आहे. यापुढे अशा लोकांच्या हातात आम्ही सत्ता देणार नसल्याचंही यावेळी शरद पवार यांनी म्हटलं आहे.

COMMENTS