देशात एकाधिकारशाही आणण्याचा हा प्रयत्न – शरद पवार

देशात एकाधिकारशाही आणण्याचा हा प्रयत्न – शरद पवार

पुणे – पवार पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित संविधान स्तंभ लोकार्पण सोहळ्याचं आयोजन धनकवडी येथे करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या हस्ते संविधान स्तंभाचं लोकार्पण करण्यात आलं. खासदार सुप्रिया सुळेंच्या मतदारसंघात धनकवडीला हा कार्यक्रम पार पडला आहे. यावेळी बोलत असताना शरद पवार यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे.

देशात काही व्यक्ती संविधान बदलण्याची भूमिका मांडतात, देशात एकाधिकरशाही आणण्याचा हा प्रयत्न आहे. कर्नाटकातील एक मंत्री हे बोलला. संविधानावर हल्ला करण्याचं काम असे वाचाळवीर करतात. ही गोष्ट हा देश कधी स्वीकारणार नाही. अशी टीका पवार यांनी केली आहे.

तसेच अयोध्येच्या वादात मला पडायचं नाही. पण देशाला मूळ प्रश्नापासून बाजूला नेण्याचा प्रयत्न सध्या सुरु आहे. अयोध्येत रामाची भव्य मूर्ती उभारणार असं तिथले मुख्यमंत्री म्हणताहेत. देशातील दुष्काळ आदी प्रश्न महत्वाचे आहेत ती मूर्तीची उंची नाही  असंही यावेळी पवारांनी म्हटलं आहे.

COMMENTS