देशात असा एकमेव खासदार असेल जो कधी घरी गेला नाही, जयसिंगराव गायकवाड यांच्या प्रवेशावर पाहा काय म्हणाले शरद पवार ?

देशात असा एकमेव खासदार असेल जो कधी घरी गेला नाही, जयसिंगराव गायकवाड यांच्या प्रवेशावर पाहा काय म्हणाले शरद पवार ?

मुंबई – राज्यात वेगळ्या पद्धतीने राज्य चालवण्याचा‌ प्रयत्न आम्ही करतोय. तिन्ही पक्षाच्या आघाडीकडून वर्षभर चांगलं सरकार चालवण्याचा आमचा‌ प्रयत्न राहिला असून संकटं आली, कधी अतिवृष्टी झाली तरीही सरकार सामान्य माणसाच्या पाठीमागे उभे राहिले असल्याचा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला. भाजपचे माजी खासदार जयसिंगराव गायकवाड यांचा आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश झाला. महाराष्ट्रात ३० वर्षे बघतोय बीड जिल्हा बघतोय. एक चांगला सहकारी आपल्यात आला आहे. सार्वजनिक जीवनात आदर्श कसा ठेवावा हे कळते. जयसिंगराव गायकवाड जिथे गेले होते तिथे त्यांचं मन रमलं नाही.

देशात असा एकमेव खासदार असेल जो कधी घरी गेला नाही. तर मतदारसंघात फिरत राहिला. सर्वसामान्य माणसांच्या सुखदुःखात सहभागी होत राहिला. सत्ता ही विनम्रपणे सांभाळायची असते हे त्यांनी केलं. त्यांचे पक्षात स्वागत आहे. राष्ट्रवादीचा प्रतिनिधी सर्वांना घेऊन काम करत आहे. अनेक संकटात जनतेच्या खांद्याला खांदा लावून सरकार व लोकप्रतिनिधी काम करत असल्याची पोचपावती शरद पवार यांनी दिली.

ईडीचा वापर विरोधकांना संपवण्यासाठी केंद्रसरकारकडून करण्यात येत आहे. शिवसेनेच्या लोकप्रतिनिधीच्या बाबतीत घडत असल्याचे आज टिव्हीवर पहायला मिळत आहे. राज्य सरकार सर्वांवर मात करुन जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करत आहे. जनतेच्या प्रश्नासाठी आघाडीचे निर्णय महत्वाचे ठरत आहेत असेही शरद पवार म्हणाले.रोगराईचे आज संकट आहे. संकट सुरुवात होण्याआधी प्रदेशाध्यक्ष यांनी संघटना मजबूत करण्यासाठी प्रयत्न केले ते काम थांबले परंतु कोरोना संपल्यानंतर तेच काम जोमाने सुरू होईल असा विश्वासही शरद पवार यांनी व्यक्त केला.

आम्ही शेवटच्या माणसासाठी काम करतोय हे चित्र लवकरच दिसेल. हे आमचं कुटुंब आहे. आणि कुटुंब म्हणून आम्ही काम करतोय. लोकांच्या भल्यासाठी सरकार काम करत आहे असेही शरद पवार यांनी शेवटी सांगितले.

COMMENTS