शरद पवार लोकसभा निवडणूक लढण्यास इच्छुक, ‘या’ मतदारसंघातून लढवणार निवडणूक ?

शरद पवार लोकसभा निवडणूक लढण्यास इच्छुक, ‘या’ मतदारसंघातून लढवणार निवडणूक ?

पुणे – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार हे आगामी लोकसभा निवडणूक लढण्यास इच्छुक असल्याची माहिती आहे. माढा लोकसभा मतदारसंघातून शरद पवार लढण्यास इच्छूक आहेत. पुण्यातील बारामती हॉस्टेलमध्ये शरद पवार, विजयसिंह मोहीते पाटील, जयंत पाटील, छगन भुजबळ यांच्यात बैठक पार पडली. या बैठकीमध्ये मला माढा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची इच्छा पवार यांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान माढा मतदारसंघातून विजयसिंह मोहीते पाटील यांचं नाव निश्चित मानलं जात होतं. परंतु अशातच या मतदारसंघातून शरद पवारांनी निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केल्यामुळे विजयसिंह मोहीते पाटील यांच्या समर्थकांमध्ये नाराजी पसरली आहे. मोहीते पाटलांचाच पत्ता कट केला जात असल्यामुळे मोहीते पाटील समर्थक नाराज झाले असून मोहीते पाटलांनाच उमेदवारी दिली जावी अशी मागणी त्यांच्या समर्थकांककडून केली जात आहे.

COMMENTS