माढा मतदारसंघातील उमेदवारीबाबत पवारांचं मोठं वक्तव्य!

माढा मतदारसंघातील उमेदवारीबाबत पवारांचं मोठं वक्तव्य!

पुणे – माढा लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीबाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. माढ्याची जागा सुरुवातीपासून आमच्याकडे आहे. ही जागा आणण्यासाठी अधिक काळजी घ्यावी म्हणून मी केवळ तिथून निवडणूक लढवणार असल्याचा सिग्नल देत होतो. मात्र मी तिथून लढणार नव्हतो. तसा माझा विचार नव्हता. आम्हाला विजयसिंह मोहितेंना तिथून लढवायचं होतं. असं वक्तव्य शरद पवार यांनी केलं आहे.

तसेच अहमदनगरच्या जागेविषयी काँग्रेसचे जे राज्यातील अन्य घटक होते ते आम्हाला सांगायचे की इथे तुमची ताकत जास्त आहे. ही जागा नेहमी राष्ट्रवादीने जिंकलीय तसेच अहमदनगरचं गणित स्पष्ट आहे. राष्ट्रवादीकडे मत जास्त होती. हे माझ्या सहकाऱ्यांचा सामूहिक मत होतं, त्यामुळे आम्ही हा निर्णय घेतला असल्याचं स्पष्टीकरणही पवारांनी दिलं आहे.

COMMENTS