शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्रीवरील बैठकीत ‘या’ विषयावर चर्चा!

शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्रीवरील बैठकीत ‘या’ विषयावर चर्चा!

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतली. उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या मातोश्रीवर या नेत्यांची बैठक पार पडली. मुंबई पोलीस दलातील बदल्या, पारनेरमधील नगरसेवकांची फोडाफोडी, सहकारी पक्षांमधील समन्वय, अधिकाऱ्यांची मर्जी आणि मर्जीतील अधिकारी अशा विविध मुद्द्यावरुन महाविकास आघाडीत धुसफूस आहे. त्या पार्श्वभूमीवर ही बैठक पार पडली.

दरम्यान मुंबई पोलीस दलातील 12 उपायुक्तांची दोन जुलैला बदली करण्यात आली होती. मात्र या बदल्यांना मुख्यमंत्री आणि गृह मंत्रालय कार्यालयाकडून स्थगिती देण्यात आली. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अधिकाऱ्यांच्या बदल्या तात्काळ रद्द करुन राष्ट्रवादी काँग्रेसला शह दिल्याचे मानले जाते. त्यामुळे आता राष्ट्रवादीच्या गोटातूनही प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे. या सगळ्यामुळे तीन पक्षांच्या सरकारच्या स्थैर्याविषयी अनेक शंका उपस्थित करण्यात येत आहेत. त्यामुळे आज शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.

COMMENTS