शरद पवारांनी घेतली आशिष शेलारांची भेट !

शरद पवारांनी घेतली आशिष शेलारांची भेट !

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांची भेट घेतली आहे. आशिष शेलारांच्या मुंबईतील निवासस्थानी जाऊन शरद पवार यांनी शेलारांची भेट घेतली असल्यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. शरद पवार आणि आशिष शेलारांची भेट राजकीय असल्याची माहिती सूत्रांनी दिली असून केंद्रातील आणि राज्यातील राजकीय विषयांवर भेटीत चर्चा झाल्याची माहिती आहे. या दोघांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात मोठे फेरबदल होणार असल्याचं बोललं जात आहे.

दरम्यान राज्यात आणि देशात मोदी सरकारविरोधात पवारांच्या नेतृत्वाखाली इतर पक्ष जमत आहेत. तसंच राज्यातही पवार आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची जवळीकता वाढत आहे. तसेच भाजपच्या मुंबईतील कार्यक्रमात पवारांनी इंजेक्शन दिल्यानंतर राहुल गांधी टीका करतात अशी टीका अमित शाह यांनी केली होती. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील पवारांना मोदींच्या नादी लागू नका असा इशारा दिला होता. त्यानंतर आता स्वतः शरद पवार यांनी शेलारांची भेट घेतल्यामुळे आगामी काळात राजकीय वर्तुळात मोठा हादरा पहायला मिळणार असल्याचं बोललं जात आहे.

COMMENTS