नारायण राणेंसोबतच्या बैठकीनंतर शरद पवारांची प्रतिक्रिया !

नारायण राणेंसोबतच्या बैठकीनंतर शरद पवारांची प्रतिक्रिया !

सिंधुदुर्ग – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार  आणि खासदार नारायण राणे यांच्यामधील बैठक संपली आहे. या दोन्ही नेत्यांमधील बैठक 20 मिनिटांमध्ये संपली आहे. तसेच या बैठकीनंतर शरद पवरा यांनी राजकीय अर्थ काढू नका असं वक्तव्य केलं आहे. त्यामुळे शरद पवार आणि नारायण राणे यांच्या बैठकीत नेमकी कोणत्या विषयावर चर्चा झाली याबाबतची माहिती अजून मिळालेली नाही.

दरम्यान कणकवली येथील राणेंच्या घरी शरद पवार यांनी भेट घेतली आहे. ही सदिच्छा भेट असल्याचं सांगण्यात येत असलं तरी आगामी निवडणुकांमुळे या भेटीबाबत राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे. शरद पवार हे कोकण दौऱ्यावर आहेत.

निलेश राणे लोकसभेच्या रत्नागिरी-सिंधुदूर्गाच्या तिकीटासाठी उत्सुक आहेत. तर दुसरीकडे या मतदारसंघात राष्ट्रवादीकडे तगडा उमेदवार असल्याचा दावा काँग्रेससोबत झालेल्या जागावाटपाच्या बैठकीत राष्ट्रवादीनं केला होता. या पार्श्वभूमीवर पवार-राणेंच्या भेटीला महत्व प्राप्त झालं आहे. परंतु बैठकीनंतर शरद पवार यांनी राजकीय अर्थ काढू नका असं म्हटलं आहे. त्यामुळे या बैठकीबाबत आता तर्कवितर्क काढले जात आहेत.

COMMENTS