शरद पवार यांच्या ताफ्यातील एका वाहनाला अपघात !

शरद पवार यांच्या ताफ्यातील एका वाहनाला अपघात !

नागपूर – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ताफ्यातील एका वाहनाला अपघात झाला आहे. नागपूर जिल्ह्यातील भारसिंगीवरून खापाकडे जाताना जामगावजवळ
हा अपघात झाला आहे. यावेळी जामगावजवळ पवार यांच्या ताफ्यातील एका गाडीने बाईकस्वाराला जोरदार धडक दिली. या घटनेत बाईकस्वार गंभीर जखमी झाला असून बाईकचेही मोठे नुकसान झाले आहे.पवार यांच्या ताफ्यातील एॅम्बुलन्सध्ये जखमी तरुणाला लगेच जलालखेडा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केेेले आहे. शरद पवार यांची गाडी अपघाताच्या वेळी लांब असल्याने शरद पवार हे पूर्णपणे सुखरूप आहेत.

दरम्यान शरद पवार हे सध्या विदर्भाच्या दौऱ्यावर असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेत आहेत. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दत्तक घेतलेल्या काटोलजवळील पेटरी या गावात जाऊन शरद पवार यांनी शेतकऱ्यांच्या व्य़था जाणून घेतल्या. त्यांनी थेट बांधावर जाऊन त्यांची भेट घेतली. यावेळी शरद पवारांसोबत माजी मंत्री अनिल देशमुख, मुख्यमंत्री फडणवीस यांच्याविरोधात लढलेले काँग्रेस नेते आशीष देशमुख उपस्थित होते.

COMMENTS