शरद पवारांनी बोलावली पक्षाच्या प्रमुख नेत्यांची बैठक !

शरद पवारांनी बोलावली पक्षाच्या प्रमुख नेत्यांची बैठक !

मुंबई – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी उद्या पुण्यात पक्षाच्या प्रमुख नेत्यांची बैठक बोलावली आहे. उद्या दुपारी 4 वाजता पुण्यात ही बैठक होणार आहे. या बैठकीत नव्या राजकीय समीकरणाबाबत चर्चा होणार असल्याची माहिती आहे. या बैठकीत शरद पवार नेत्यांची मतं जाणून घेणार आहेत. त्यानंतर शरद पवार दिल्लीला रवाना होणार आहेत. त्यामुळे उद्याच्या या बैठकीकडे लक्ष लागलं आहे.

दरम्यान शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा किमान समान कार्यक्रमाचा मसुदा तयार झाला असून यावर राज्यातील नेत्यांचं एकमत झालं असल्याची माहिती आहे. हा ड्राफ्ट लवकरच हायकमांडकडे पाठवला जाणार आहे. महाशिवआघाडीच्या मसुद्याबाबत दिल्लीत शरद पवार आणि सोनिया गांधी अंतिम निर्णय घेणार आहेत. हायकमांड मृसुद्यात काय बदल करायचे असेल त्या सूचना देतील अशी माहिती आहे. या बैठकीपूर्वी पवारांनी पक्षातील प्रमुख नेत्यांची बैठक बोलावली आहे.

COMMENTS