तो निर्णय पक्षाचा नसून, अजित पवार यांचं वैयक्तिक मत – शरद पवार

तो निर्णय पक्षाचा नसून, अजित पवार यांचं वैयक्तिक मत – शरद पवार

नाशिक – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राष्ट्रवादी नेते अजित पवार यांच्यात मतमतांतर असल्याचं पुन्हा अकदा दिसून आलं आहे. शिवस्वराज्य यात्रेत अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या झेंड्यासोबत भगवा झेंडाही यापुढे बाजूला लागेल, असं वक्तव्य केलं होतं. अजित पवार यांच्या घोषणेनंतर राष्ट्रवादीमध्येच दोन गट दिसून आले होते. त्यानंतर आता याबाबत शरद पवार यांनी पक्षाची भूमिका व्यक्त केली आहे. हा निर्णय पक्षाचा नसून, ते अजित पवार यांचं वैयक्तिक मत असल्याचं शरद पवार यांनी स्पष्ट केलं.ते नाशिक येथेील पत्रकार परिषदेत बोलत होते.

दरम्यान राष्ट्रवादीचे कार्यक्रम आणि सभांमध्ये पक्षाच्या झेंड्यासोबतच भगवा झेंडाही यापुढे असेल, असं अजित पवारांनी शिवस्वराज्य यात्रेत सांगितलं होतं. पण पक्ष स्तरावर याला दुजोरा देण्यात आला नाही. यासोबतच भगवा झेंडा ही कुणाची मक्तेदारी नसल्याचंही राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी म्हटलं होतं. त्यानंतर शरद पवार यांनी आज राष्ट्रवादी पक्षाचा झेंडा बदलण्याबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही. आहे तोच झेंडा राहील. झेंड्याबाबतचं अजित पवार यांचं मत वैयक्तिक आहे. आता फक्त निवडणूक हेच लक्ष्य असेल, असं शरद पवारांनी जाहीर केलं आहे.

COMMENTS