अजित पवारांच्या ‘त्या’ ट्वीटनंतर शरद पवार कडाडले, म्हणाले….

अजित पवारांच्या ‘त्या’ ट्वीटनंतर शरद पवार कडाडले, म्हणाले….

मुंबई – काही वेळापूर्वीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ट्टीट केलं होतं. यामध्ये त्यांनी मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच आहे, आणि कायम राष्ट्रवादीमध्येच राहीन. पवार साहेब आमचे नेते आहेत. भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस मिळून महाराष्ट्रात स्थिर सरकार देतील असं ट्विट अजित पवारांनी केलं आहे. तसेच अजित पवारांनी आपल्याला मिळालेल्या पाठींब्याबद्दल सर्वांचे आभार मानत, थोडा संयम राखण्याचंही आव्हान आपल्या कार्यकर्त्यांना आणि पाठीराख्यांना केलं.

दरम्यान अजित पवारांच्या या ट्वीटनंतर शरद पवार कडाडले आहेत. पवारांनीही एक ट्वीट केलं असून यामध्ये त्यांनी भाजपशी युती करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. अजित पवार यांचं वक्तव्य खोटं आणि दिशाभूल करणारं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने एकमताने सरकार स्थापनेसाठी शिवसेना आणि काँग्रेस यांच्याशी युती करण्याचा निर्णय घेतला आहे. श्री अजित पवार यांचं विधान हे खोटं, संभ्रम निर्माण करणारं, तसंच लोकांची दिशाभूल करणारं आहे.’ असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

COMMENTS