अजित पवार, पार्थ, रोहीत पवार लोकसभा निवडणूक लढवणार का ?,  शरद पवार यांची मोठी प्रतिक्रिया!

अजित पवार, पार्थ, रोहीत पवार लोकसभा निवडणूक लढवणार का ?, शरद पवार यांची मोठी प्रतिक्रिया!

मुंबई – शिवसेना-भाजप युतीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. युतीला 45 नाही तर 48 जागा मिळतील असा खोचक टोला शरद पवार यांनी सेना-भाजपला लगावला आहे. युतीला 45 जागा मिळतील असा दावा युतीचे नेते करत आहेत.
युती होणारच होती. यात काही आश्चर्य नाही असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.

तसेच सत्तेची उब दोघांनाही सोडायची नाही अशी टीकाही पवार यांनी केली आहे. तसेच आगामी लोकसभा निवडणूक अजित पवार, पार्थ पवार, रोहीत पवार
लढवणार नसल्याचंही शरज पवार यांनी जाहीर केलं आहे. तसेच मी माढ्यातून निवडणूक लढवणार असल्याचही पवार यांनी म्हटलं आहे.

COMMENTS