लोकसभेसारखा विधानसभेत फटका बसू नये म्हणून शरद पवारांनी उचललं ‘हे’ पाऊल !

लोकसभेसारखा विधानसभेत फटका बसू नये म्हणून शरद पवारांनी उचललं ‘हे’ पाऊल !

मुंबई – लोकसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीला जोरदार फटका बसला. त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी तळागाळातील कार्यकर्त्यांपर्यंत पोहचण्यासाठी सोशल मीडियाचा जास्तीतजास्त वापर करण्याचं ठरवलं आहे. याच पार्श्वभूमीवर उद्या शरद पवार हे त्यांच्या फेसबुक पेजवरून तरुणांशी संवाद साधणार आहेत.ते सकाळी 11 वाजता त्यांच्या Sharad Pawar या फेसबुक पेजवर LIVE असणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 10 जून रोजी वर्धापन दिन आहे.

त्याआधी होणाऱ्या या संवादात शरद पवार पक्षाच्या ध्येय-धोरणाविषयी बोलण्याची शक्यता आहे. तसंच ते फेसबुकवरून राज्यभरातील कार्यकर्त्यांच्या भावनाही जाणून घेणार आहेत.तसेच ते सर्वसामान्यांनी विचारलेल्या प्रश्नांनाही उत्तर देणार आहेत. लोकांनी आपल्या नाव-गावासह प्रश्न विचारावेत. त्यातील निवडक प्रश्नांना शरद पवार उत्तर देतील, असं राष्ट्रवादीकडून सांगण्यात आलं आहे.

दरम्यान गेल्या दोन लोकसभा निवडणुकीत भाजपने जोरदार सोशल मीडियाचा वापर केला. तळागाळातील कार्यकर्त्यांपर्यंत ते पोहचले. त्यामुळे दोन्ही निवडणुकीत भाजपला मोठ यश मिळालं. परंतु त्या तुलनेत या तंत्राचा प्रभावी वापर करणं विरोधकांना जमलं नाही. याचा त्यांना निवडणुकीत मोठा फटका बसला. त्यामुळे आगामी काळात असा फटका बसू नये म्हणून शरद पवार यांनी हे पाऊल उचलल्याचं बोललं जात आहे.

COMMENTS