आज बाळासाहेब असते आणि त्यांना असे कळले असते, तर त्यांनी फटके दिले असते – शरद पवार

आज बाळासाहेब असते आणि त्यांना असे कळले असते, तर त्यांनी फटके दिले असते – शरद पवार

औरंगाबाद – एमजीएम परिसरात बाळासाहेब ठाकरे  यांच्या पुतळ्यासाठी झाडे तोडणार होते असे ऐकलं. मात्र आज बाळासाहेब असते आणि त्यांना असे कळले असते, तर त्यांनी फटके दिले असते, मी त्यांना ओळखायचो, झाडे तोडायचे समर्थन त्यांनी कधीच केलं नाही असं वक्तव्य राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे.
शरद पवार यांनी आज औरंगाबादेतील एमजीएम शिक्षण संस्थेतील अंकुशराव कदम यांच्या अमृतमहोत्सवी सोहळ्याला हजेरी लावली. या सोहळ्यात शरद पवारांनी अनेक किस्से सांगितले.

शरद पवारांनी सांगितला शाळेचा किस्सा

मला एकजण भेटला तेव्हा मी त्याला विचारलं की काय काम करता? तेव्हा तो म्हणाला की माझी शाळा आहे. मी विचारलं की प्रपंच कसा चालतो? तर म्हणाला की शाळा आहे. प्रपंच चालवण्यासाठी शाळा, हे काय मला समजलं नाही. आमच्यासारख्यांना माहीत आहे की शेती असली आणि दारात चार म्हशी असल्या तरी घर-प्रपंच चालतं. मात्र जेव्हा लोक शाळेचा वापर प्रपंच  चालवण्यासाठी करतात तेव्हा मला चिंता वाटते, असंही यावेळी पवार म्हणाले.

COMMENTS