हल्ली तू चांगले सल्ले देतोस, शरद पवारांनी केलं भाजप खासदाराचं कौतुक !

हल्ली तू चांगले सल्ले देतोस, शरद पवारांनी केलं भाजप खासदाराचं कौतुक !

पुणे – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजप आमदाराचं कौतुक केलं आहे. भाजपचे पुण्यातील सहयोगी खासदार संजय काकडे यांना पवारांनी हल्ली तू चांगले सल्ले देतोस असं म्हटलं आहे.  नुकतीच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन वाढदिवसानिमित्त संजय काकडे यांनी पवारांना शुभेच्छा दिल्या होत्या. यावेळी या दोघांच्या संभाषणात नेमकी काय चर्चा झाली याची माहिती नव्हती. परंतु पत्रकारांसोबत झालेल्या एका चर्चेदरम्यान संजय काकडे यांनी या भेटीतील संभाषण पत्रकारांना बोलून दाखवलं आहे. यावेळी पवारांनी मला तू चांगले सल्ले देतोस असं म्हटलं असल्याचं काकडे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान पाच राज्यांच्या विधानसभांच्या निवडणुकीत भाजपचा पराभव झाला. त्यावर काकडे यांनी माध्यमांशी बोलताना भाजपला सल्ला दिला होता. भाजपला जिंकायचे असेल तर भाजपने आता हनुमानाची जात, शहरांचे नामकरण, राममंदिर यावर राजकारण न करता विकासावर बोलावे असे मत यावेळी काकडे यांनी व्यक्त केलं होतं. योगायोगाने काकडे यांचं मत खरं ठरलं असून यावरुनच पवारांनी काकडे यांचं कौतुक करत हल्ली तू चांगले सल्ले देतोस असं म्हटलं आहे.

 

COMMENTS