शरद पवारांचा चंद्रकांत पाटलांना टोला, “अशा राष्ट्रीय नेत्यावर मी काय बोलणार !”

शरद पवारांचा चंद्रकांत पाटलांना टोला, “अशा राष्ट्रीय नेत्यावर मी काय बोलणार !”

कोल्हापूर – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना टोला लगावला आहे. चंद्रकांत पाटील यांना दिल्ली विधानसभा निवडणुकीवेळी घरभर चिठ्ठ्या वाटतानाचा फोटो मी पाहिला आहे. त्यामुळे अशा राष्ट्रीय नेत्यावर मी काय बोलणार असं पवार यांनी म्हटलं आहे.भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी दिल्लीत काँग्रेसने ‘आम आदमी पक्षा’शी हातमिळवणी केली असल्याचा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला होता. यावर शरद पवारांना प्रतिक्रिया दिली आहे.

दरम्यान दिल्ली विधानसभा निवडणुकांच्या निकालावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शेखी मिरवू नये, ‘आम आदमी पक्षा’ला मिळालेल्या यशात त्यांचं काहीही योगदान नाही, अशी घणाघाती टीका चंद्रकांत पाटील यांनी केली होती. दिल्लीच्या निकालाचा टेंभा शिवसेनेनेही मिरवू नये. काँग्रेसने शरणागती पत्करली, त्यामुळे ‘आप’चा विजय झाला. शरद पवार आणि शिवसेनेने भाजपला खिजवण्याचं काम करु नये, असं चंद्रकांत पाटलांनी सुनावलं होतं.

त्यानंतर पवार यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळी माझ्या वाचनात आलं, खरं खोटं माहित नाही. चंद्रकांत पाटील यांना घरभर चिठ्ठ्या वाटतानाचा फोटो मी पाहिला आहे. त्यामुळे अशा राष्ट्रीय नेत्यावर मी काय बोलणार’ असं म्हणत शरद पवार यांनी चंद्रकांत पाटील यांना टोला लगावला आहे.

COMMENTS