कुस्ती ही पैलवानांसोबत करायची असते, शरद पवारांचं मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर!

कुस्ती ही पैलवानांसोबत करायची असते, शरद पवारांचं मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर!सोलापूर – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रत्युत्तर दिलं आहे. मुख्यमंत्री म्हणतात आम्ही तयार आहोत, पण कुस्ती करायला समोर कुणीच राहिलं नाही. पण कुस्ती ही पैलवानांसोबत करायची असते. या असल्या लोकांसोबत नाही,’ असा टोला पवारांनी मुख्यमंत्र्यांना लगावला आहे.बार्शी इथं आयोजित राष्ट्रवादीच्या प्रचारसभेत शरद पवार यांनी सत्ताधारी भाजपचा जोरदार समाचार घेतला.

दरम्यान शिवस्मारक, गड किल्ले भाड्याने देण्याचा मुद्दा आणि कलम 370 यावरून त्यांनी मुख्यमंत्र्यांसह भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनाही लक्ष्य केलं. तसेच या सरकारच्या काळात 16 हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. मी कृषीमंत्री असताना एक आठवड्यात कर्जमाफी केली होती.हे सरकार ऑनलाईन कर्जमाफी करत आहेत. कुटुंबात सगळ्यांनी शेती करणे आता परवडणार नाही.
बार्शीतील आर्यन कारखाना बंद कशामुळे झाला हे कळलं नाही असा सवालही पवार यांनी केला आहे. कारखाने बंद झाल्याने नाशिकमध्ये 10 हजार कामगारांची नोकरी गेली. बेकारांचे तांडे बनविण्यासाठी, कामगारांची चूल बंद करण्यासाठी या सरकारला मत देणार का? असा सवालही यावेळी पवारांनी जनतेला केला आहे.

COMMENTS