मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरे तयार नसतील तर… शरद पवारांनी सुचवलं हे नाव?

मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरे तयार नसतील तर… शरद पवारांनी सुचवलं हे नाव?

मुंबई – राज्यात महाविकासआघाडी सरकार स्थापन करण्यासाठी जोरदार हालचाली सुरु झाल्या आहेत. पुढील पाच वर्ष शिवसेनेचा मुख्यमंत्री असणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्री कोण होणार याकडे लक्ष लागलं आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीच मुख्यमंत्री व्हावं, असा आग्रह शरद पवारांनी केला असल्याची माहिती आहे. पवारांच्या या आग्रहाला राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या नेत्यांचीही मान्यता आहे. परंतु उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदासाठी तयार नसतील तर पवारांकडून संजय राऊत यांचं नाव पुढे करण्यात आलं आहे. परंतु, उद्धव ठाकरे मात्र संजय राऊतांच्या नावासाठी तयार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

दरम्यान काल झालेल्या चर्चेत शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना हा आग्रह केल्याची माहिती आहे. तीन पायांचं सरकार चालवण्यासाठी सोपं होईल, या उद्देशानं पवारांनी उद्धव ठाकरेंना हा आग्रह केला आहे. उद्धव ठाकरे ही जबाबदारी घेण्यासाठी उत्सुक नसतील तर संजय राऊत यांना मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी घेण्याचंही पवारांनी सुचवलं आहे. संजय राऊत यांचे राष्ट्रवादी आणि काँग्रेसशी संबंध चांगले आहेत तसंच ते चांगले समन्वयक असल्यानं त्यांचं नाव पवारांकडून सुचवण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. परंतु
उद्धव ठाकरे हे पक्षातील इतर ज्येष्ठ नेत्यांलाठी उत्सूक असल्याची माहिती आहे.

COMMENTS