फडणवीस डोक्यात हवा जाऊ देऊ नका – शरद पवार

फडणवीस डोक्यात हवा जाऊ देऊ नका – शरद पवार

नाशिक – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना खडसावलं आहे. देवेंद्र फडणवीस अजून तुम्ही लहान आहात, डोक्यात हवा जाऊ देऊ नका, मुख्यमंत्री काहीही बोलत सुटलेत. आमचे उमेदवार समीर भुजबळ जामिनावर आहेत असं ते म्हणाले. परंतु तुम्हा ज्या पक्षात आहात त्या पक्षाच्या अध्यक्षांवर किती आरोप आहेत हे विसरू नका असंही पवारांनी मुख्यमंत्र्यांना म्हटलं आहे. नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार समीर भुजबळ यांच्या प्रचारसभेत ते बोलत होते.

दरम्यान मुख्यमंत्र्यांनी मिळालेल्या सत्तेचा उपयोग समाजाच्या भल्यासाठी करायचा असतो. त्याचा तुम्हाला विसर पडला आहे. तुम्ही भलत्याच विषयाकडे जात आहात. त्यामुळे अजून तुम्ही लहान आहात, डोक्यात हवा जाऊ देऊ नका असंही पवारांनी मुख्यमंत्र्यांना म्हटलं आहे.  यावेळी विविध मुद्यांवरुन त्यांनी मोदी सरकारवरही जोरदार टीका केली आहे.

COMMENTS