जनता दरबार कार्यक्रमात अचानक शरद पवारांची एन्ट्री, आरोग्य मंत्री राजेश टोपेंना म्हणाले…

जनता दरबार कार्यक्रमात अचानक शरद पवारांची एन्ट्री, आरोग्य मंत्री राजेश टोपेंना म्हणाले…

मुंबई – राज्यात रेमडेसिवीरचा तुटवडा भासत असल्याचे समजताच राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी तात्काळ १ हजार इंजेक्शन्स उपलब्ध करून देण्याची व्यवस्था केली आहे. आज आरोग्यमंत्री राजेश टोपे हे जनता दरबार उपक्रमांतर्गत राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयात उपस्थित असतानाच अचानक शरद पवार यांनी त्यांची भेट घेतली.
सर्वप्रथम गरजू आणि गरीब जनतेसाठी या रेमडेसिवीर इंजेक्शन्सचा वापर करा अशी सूचनाही शरद पवार यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना केली.

COMMENTS