डी वाय पाटील यांचा वाढदिवस, शरद पवार, मनोहर जोशींनी जागवल्या आठवणी !

डी वाय पाटील यांचा वाढदिवस, शरद पवार, मनोहर जोशींनी जागवल्या आठवणी !

मुंबई – डी वाय पाटील यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमानिमित्त आज मुंबईत त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष आणि शिवसेनेचे नेते मनोहर जोशी यांनी डी वाय पाटील यांच्यासोबतच्या आठवणी जागवल्या आहेत. डी वाय पाटील यांचे नाव ज्ञानेश्वर यशवंत पाटील असं चांगलं असताना डी वाय पाटील या नावाने ते ओळखले का जातात असा मला प्रश्न पडतो असं वक्तव्य यावेळी मनोहर जोशी यांनी केलं आहे. तर या कार्यक्रमाला उपस्थित असलेली गर्दी पाहून मला वाटले ही शिवसेनेची सभा आहे.  ही गर्दी त्यांच्यावरील प्रेमाचे प्रतिक असल्याचंही यावेळी मनोहर जोशी यांनी म्हटलं.

दरम्यान यावेळी शरद पवार यांनी डी वाय पाटील यांच्यासोबतच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. मी आणि डी वाय पाटील यांच्यात सुरूवातीला शेतीबाबत सुसंवाद व्हायचा. दहा वर्ष आम्ही विधिमंडळात काम केलं. सामान्यांच्या हिताचा प्रश्न आला तर ते सरकार विरोधातही संघर्षाची भूमिका घ्यायचे. शिक्षणाच्या क्षेत्रात उतरले, अनेक संस्था उभ्या केल्या पण त्याचा दर्जाही टिकवला. सरकारी अनुदानाशिवाय शिक्षण संस्था उभं करण्याचं काम करून वसंतदादा पाटील यांचं स्वप्न त्यांनी पूर्ण केलं. त्यांच्या संस्थेत गरीब विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश देण्याच्या सूचना त्यांनी आपल्या संस्थांना दिले आहेत. त्यामुळे त्यांचं विशेष अभिनंदन असंही यावेळी शरद पवार यांनी म्हटलं आहे.

 

COMMENTS