एकनाथ खडसेंना धक्का, राष्ट्रवादीत प्रवेश देण्याबाबत शरद पवार म्हणाले…

एकनाथ खडसेंना धक्का, राष्ट्रवादीत प्रवेश देण्याबाबत शरद पवार म्हणाले…

औरंगाबाद – भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे राष्ट्रवादीत जाणार असल्याची चर्चा आहे. परंतु अशातच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. एकनाथ खडसे हे मला भेटले होते. त्यांच्याशी माझी चर्चाही झाली. पण त्यांचे समाधान करण्याएवढी साधनसामुग्री सध्या तरी माझ्याकडे नाही, असं पवार यांनी म्हटलं आहे.
शरद पवार यांच्या या वक्तव्यामुळे खडसे यांना मोठा धक्का बसला असल्याचं बोललं जात आहे.

दरम्यान एकनाथ खडसे यांनी दोन दिवसांपूर्वी नागपूर येथे पवारांची भेट घेतली होती. त्यामुळे खडसे भाजपला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादीत प्रवेश करणार अशी जोरदार चर्चा सुरू आहे. याबाबत पत्रकारांनी शरद पवार यांना त्याबाबत विचारला असता त्यांनी खडसे हे मला भेटले होते. माझी त्यांच्याशी सविस्तर चर्चा झाली. मात्र, त्यांचे समाधान करण्याइतपत साधनसामुग्री माझ्याकडे नसल्याचे म्हटलं आहे. औरंगाबादमध्ये पक्षाच्या एका कार्यक्रमात ते बोलत होते.

एकनाथ खडसे यांनी पक्ष सोडण्याचा इशारा दिला आहे.भाजपमधील घरभेद्यांवर कारवाई करा अन्यथा आपण 5 दिवसांमध्ये पक्षांतर करणार असल्याचं एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे.तसेच आपल्याला इतर तिन्ही प्रमुख पक्षांकडून निमंत्रण आल्याचंही खडसे म्हणाले आहेत. एकनाथ खडसे यांची थेट पक्षाला इशारा देण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे एकनाथ खडसे काय निर्णय घेणार. तसेच त्यांच्या इशाय्राची पक्ष दखल घेणार का हे पाहण गरजेचं आहे.

COMMENTS