एकनाथ खडसेंबाबत शरद पवारांचा गौप्यस्फोट, पक्षात घेण्याबाबत म्हणाले…

एकनाथ खडसेंबाबत शरद पवारांचा गौप्यस्फोट, पक्षात घेण्याबाबत म्हणाले…

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एकनाथ खडसे यांच्याबाबत गोप्यस्फोट केला आहे. एकनाथ खडसे हे गेल्या काही महिन्यांपासून संपर्कात आहेत. मात्र त्यांचं पक्षात येण्याबाबात अजुन काही निश्चित सांगता येत नाही. एकनाथ खडसे काय पर्याय शोधतील हे आत्ताच काही सांगता येत नाही. पर्याय हा लगेच तयार होत नसतो. असं शरद पवारांनी पत्रकार परिषदेत म्हटलं आहे.

दरम्यान एकनाथ खडसे यांना भाजपच्या दोन याद्या प्रसिद्ध होऊनही उमेदवारी मिळाली नाही. त्यामुळे खडसे नाराज आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी बीडचा नियोजित दौरा रद्द करून जळगावला ते एकनाथ खडसे यांची भेट घेण्यासाठी पोहचले असल्याची माहिती आहे. त्यामुळे एकनाथ खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करणार का हे पाहण गरजेचं आहे.

COMMENTS