“सरकारकडून बँकांना 15 दिवसात 80 हजार कोटींची खैरात, मग शेतक-यांसाठीच पोटदुखी का ?”

“सरकारकडून बँकांना 15 दिवसात 80 हजार कोटींची खैरात, मग शेतक-यांसाठीच पोटदुखी का ?”

पंढरपूर – ‘महाराष्ट्रातील अडचणीत आलेल्या शेतकऱ्याला कर्जमाफी दिल्यावर काही मंडळींच्या पोटात दुखतंय, पण गेल्या १५ दिवसांत राष्ट्रीयकृत बँकेचा तोटा भरून काढण्यासाठी केंद्र सरकारने तिजोरीतून ८० हजार कोटी रुपये कसे काय दिले  असा सवाल राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. अकलूजमध्ये पत्रकारांशी बोलत असताना त्यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे.

दरम्यान शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी पैसे नाहीत, असे म्हणणाऱ्या सरकारकडे बँकांची तूट भरून काढायला पैसे कोठून आले असा सवाल त्यांनी त्यावेळी केला आहे. तसचे कोणाच्या कितीही पोटात दुखलं तरी शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे यावर आम्ही ठाम असून त्याच्या डोक्यावरचे ओझे उतरवून त्याला सन्मानाने जगण्याची संधी मिळाली पाहिजे असंही पवार यांनी म्हटलं आहे.

COMMENTS