भूकंपावर मात केली, यावरही मात करू, शरद पवारांनी दिला शेतकय्रांना धीर! पाहा व्हिडीओ

भूकंपावर मात केली, यावरही मात करू, शरद पवारांनी दिला शेतकय्रांना धीर! पाहा व्हिडीओ

उस्मानाबाद – राज्य शासनाची आर्थिक क्षमता नसून केंद्र शासनाच्या मदतीने राज्यातील अतिवृष्टी झालेल्या शेतकऱ्यांना पुरेशी मदत केली जाईल. त्यासाठी आम्ही सर्व आघाडीचे घटक पंतप्रधानांशी चर्चा करणार आहोत. त्यांची भेट घेऊन राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा आमचा प्रयत्न राहील. असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी अतिवृष्टी झालेल्या शेतकऱ्यांना दिला आहे. त्यांनी रविवारी लोहारा, तुळजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांशी संवाद साधला. नुकसान झालेल्या पिकांची, परिस्थितीची पाहणी करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे.

अतिवृष्टीमुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. संपूर्ण जमीनच खरवडून गेल्याचे अनेक ठिकाणी दिसले. हे नुकसान एका दिवसात भरुन येणारे नाही. लोहारा, उमरगा तालुक्यातील भूकंपग्रस्त भागातही अतिवृष्टीने मोठे नुकसान झाले आहे. १९९३च्या भूकंपात या भागातील हजारो जीव गेले. हे दु:ख विसरुन आपण उभे राहिलो. त्याप्रमाणेच याही संकटातून आपण उभे राहू, तुम्ही धीर धरा, आपण नक्की मार्ग काढू असंही पवार म्हणाले. मदतीसाठी राज्य सरकारला काही मर्यादा आहेत. त्यामुळे केंद्रानेही मदत केली पाहिजे असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.

 

COMMENTS