पाकिस्तानमधील सर्वसामान्य जनतेला भारतीयांबद्दल आपुलकी, शरद पवारांनी सांगितली आठवण !

पाकिस्तानमधील सर्वसामान्य जनतेला भारतीयांबद्दल आपुलकी, शरद पवारांनी सांगितली आठवण !

पुणे – पाकिस्तानमधील सर्वसामान्य जनतेला भारतीयांबद्दल आपुलकी असल्याचं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे. पाकिस्तान म्हटले की आपल्या डोळ्यासमोर दहशतवाद आणि हल्ला इतकेच येते. पण पाकिस्तानमधील जनतेला भारतीयांबद्दल आपुलकी आहे. शरद पवार यांनी पाकिस्तान दौऱ्यातील एक आठवणही सांगितली. ‘मी बीसीसीआयचा अध्यक्ष असताना पाकिस्तानमध्ये गेलो होतो. सामना संपल्यावर आम्ही एका हॉटेलमध्ये गेलो. त्या हॉटेल मालकाने आमच्याकडून पैसे घेतले नाही. तुम्हाला मी टीव्हीवर बघितले होते. तुम्ही आमचे पाहुणे असल्याने मी पैसे घेणार नसल्याचं त्यांनी म्हटलं. त्यामुळे पाकिस्तानमधील सर्वसामान्य जनतेला भारतीयांबद्दल खूप आपुलकी असल्याचं पवार यांनी म्हटलं आहे.

दरम्यान ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे यांच्या ‘वी द चेंज, आम्ही भारताचे लोक’ या पुस्तकाचे शनिवारी शरद पवार यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. त्यावेळी त्यांनी  पुस्तकातील भारत- पाकिस्तान संबंधावरील उल्लेखाबाबत आठवण सांगितली. लोकांना आज चांगले पर्याय, चांगले नेतृत्व दिसत नाही. त्यामुळे जनतेत अस्वस्थता आहे. नोटबंदीचा निर्णय घ्यायचा अधिकार पंतप्रधानांना नाही. मात्र तरीही अशा प्रकारचा निर्णय मोदींनी घेतला. यामुळे नक्षलवाद आणि दहशतवाद संपेल अशी दिशाभूल करण्यात आली असल्याची टीका पवार यांनी यावेळी केली आहे.

 

 

 

COMMENTS