महाआघाडीऐवजी फक्त राज्यांतच आघाड्या कराव्यात, शरद पवारांचा राहुल गांधींना सल्ला !

महाआघाडीऐवजी फक्त राज्यांतच आघाड्या कराव्यात, शरद पवारांचा राहुल गांधींना सल्ला !

नवी दिल्ली – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना महाआघाडीबाबत सल्ला दिला आहे. महाआघाडीऐवजी राज्यात आघाड्या कराव्यात तसेच राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर विरोधकांच्या संयुक्त सभा टाळणे हे योग्य ठरेल असं पवारांनी सुचवले आहे. तसेच विरोधी पक्षांनी राज्यांत व मतदारसंघांत आपापल्या उमेदवारांचा विजय निश्चित होण्यावर लक्ष केंद्रित करावे. संयुक्त सभा राज्य पातळीवर गरज असेल तरच घेतल्या जाव्यात असंही पवारांनी म्हटलं असल्याची माहिती आहे. त्यामुळे प्रत्येक पक्ष आपआपल्या उमेदवारांचा प्रचार स्वतः करणार आहेत.

दरम्यान महाराष्ट्रातही राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने युती करण्याचे तत्वत: ठरवले आहे. तसेच इतर राज्यांतही आघाड्या करण्याची हीच वेळ असल्याचंही राहुल गांधी यांच्यासोबतच्या बैठकीत पवारांनी म्हटलं आहे. तसेच राष्ट्रव्यापी संयुक्त सभा नकोत व अशा संयुक्त प्रचार फक्त राज्यांतच मर्यादित ठेवाव्यात, असंही पवारांनी सुचवले असल्याची माहिती आहे.

तसेच आगामी लोकसभा निवडणूक ‘मोदी विरुद्ध इतर अशी बनवणे भाजपाला आवडेल तसेच विरोधकांपेक्षा आपण किती श्रेष्ठ आहोत अशी स्वत:ची प्रतिमा भाजपा रंगवू शकते. त्यामुळे महाआघाडीऐवजी राज्यांमध्ये आघाडी करणं योग्य ठरणार असल्याचं म्हणणं पवारांनी राहुल गांधींसमोर मांडलं आहे.

COMMENTS